Sunday, November 16, 2008

सावरकारांवर मी लिहिलेला हा एक जुना लेख आहे याला शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविणार्‍या वार्षिंकांकात स्थान मिळाले होते. कॉलेज मधील वार्षिंकांकात सुद्धा याचा समावेश करण्यात आला होता।

सावरकर - एक जीवनयज्ञ
भारतात विचारवंतांच्या ज्या दोन विचारमाला आहेत त्यात 'फुले-आगरकर-रॉय-नेहरू ' यांचा धर्म-संस्कृती-परंपरा यांचा फारसा अभिमान नसणार्‍या पण आंतरराष्ट्रीय दृष्टी आणि उदारमतवादी धोरण असणारा नास्तिक तर ' टिळक -विवेकानंद-अरविंद बाबू ' यांचा धार्मिक-राष्ट्रवादी व परंपरेचा सार्थ अभिमान बाळगणारा अस्तिक असा दुसरा गट

स्वातंत्र्यवीर सावरकर वरीलपैकी एकाही विचरमालेत बसत नाहीत. वयाच्या बाराव्या वर्षीच मातृभूच्या वैभवाचा सदैव ध्यास धरणारी ,सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारी ,उज्ज्वल ध्येयवादी तरुणाना प्रत्येक प्रसंगात प्रेरणादायी, उत्कट राष्ट्रवादी विज्ञानाशिवाय अन्य कशावरही विश्वास न ठेवणारी पण कुठलीच अपेक्षा करणारी क्रांतीवीरांच्या मालेतिल सर्वात भव्य ,दिव्य नि विलक्षण व्यक्तिमत्त्वांची वैचारिक तितकेच वास्तविक विचारमालिका म्हणजे स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर ( नुसते विनायकरावच नव्हे तर त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून आपल्या वंश निर्वंश होईल याची जराही तमा न बाळगता स्वातंत्र्ययुद्धात भाग घेणारे त्यांचे बंधू बाबाराव व गणेशपंत हेही विनायकरवा ईतकेच श्रेष्ठ आहेत.)

साडेपाच हजार वर्षानंतर गीता फक्त वृद्धांसाठीच उपयुक्त वाटू लागली आहे यात गीतेचा पराभव नसून विज्ञान युगातील गीतेच्या अज्ञानी शिष्यांचा पराभव आहे. शस्त्राला हात न लावता गांधीजीनी स्वातंत्र्याची लढाई जिंकून दिली अशी खोटी ,भ्रामक माहिती सांगून जनतेला फसवणारे आज सत्य ,अहिंसा या त्यांच्या तत्वाला क्षञोक्षणी गाडून टाकत आहेत आणि त्यांच्या तत्वांचा पराभव घडवून आणत आहेत. नेहरू यांच्या तत्वांचा तर त्यांच्यासमोरच पराभव झाला .१९५५ ला मुक्त उडणारी कबुतरे १९६४ च्या युद्धात शिकार झाली. साने गुरुजी यांच्याही तत्वज्ञानाचा असाच पराभव झाला आणि त्याची परिणीती त्यांच्याच आत्महत्येत झाली.मूर्तिपुजेला विरोध करून कृतीलाच महत्व देणारे गाडगेबाबा; पण त्यांच्या अनुयायानी त्यांचीच मूर्ती बनवून त्यांच्या तत्वाला हरताळ फासला. दलित बंदवांसाठी शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या बाबासाहेबानी दलिताना ' शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा ' म्हणून महामंत्र दिला; त्यानुसार दलित बांधव शिकले आणि संघर्षही करू लागले पण संघटित न झाल्यामुळे बाबासाहेबानी जी चळवळ उभी केली होती त्याचे जे नुकसान झाले आहे ते कशानेही भरून येऊ शक्त नाही. या उलट सावरकरा नी दिलेला

" एक देव ,एक देश,एक आशा

एक जाती ,एक जीव ,एक भाषा "

हा महामंत्र दिवसेंदिवस अजुन तेजस्वी आणि उज्ज्वल होत चाललेला आपण बगत अहोतच. विशेषता: अंधश्रद्धेविरुद्धचे त्यांचे विचार , विज्ञानावरचा त्यांचा विश्वास ,त्यानी दिलेला कडवा राष्ट्रवादचा विचार यांचा तर हे जग असे पर्यंत कधी पराभव दिसत नाहीए " या जगावर शास्त्रांचेच साम्राज्य राहील " किती समर्पकरित्या सांगितले आहे त्यानी . त्याचे प्रत्यय आज आपल्याला येत आहे. संरक्षणासाठी आपल्याला शस्त्र लागणार नाहीत म्हणणारे आज मात्र संरक्षणासाठी नवी-नवी शस्त्रे वापरायला सांगत आहेत आणि वर हेही सांगत आहेत की आपण फक्त स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगत आहोत. अरे वा रे वा मग सावाराकरानी दुसरे काय सांगितले होते ? स्वसंरक्षणच ना ?

एकमेवाद्वितियम सावरकर-

पहिले व एकमेव क्रांतीकारी ज्याना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या

हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात ज्यांच्यावर खटला चालविला गेला असे ते पहिले नागरिक.

राजनिष्ठेचा शपथ घ्यायला नकार दिला म्हणून ज्यांची बॅरिस्टर पदवी रोखण्यात आली असे ते पहिले भारतीय.

असे पहिले भारतीय लेखक ज्यांची पुस्तके छापलयाआधीच जप्त करण्यात आली .

राजकीय कारणास्तव महाविद्यलायच्या वस्ती ग्रहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी.

परदेशी कापडांची प्रकट होळी करणारे ते पहिले भारतीय नेते .

संपूर्ण स्वराज्य हेच देशाचे ध्येय म्हणणारे ते पहिलेच राजकीय नेते.

अजुन ही बरीच उदाहरणे देता येतील.

सावरकराणी आपल्या जगप्रसिद्ध सागरउडीचा कधीच बाजार मंडला नाही.

कुशाग्र बुद्धिमत्ता ,इतिहास ,राजकारणाचा गाढा अभ्यास-व्यासंग,द्रष्ठेपणा,मुत्साद्दिपणा,तेजस्विता,अचाट असा बौद्दिक व शारीरिक पराक्रम,अजोड असे प्रभावी वक्तृत्व ,अभ्यासू संभाषण कुशलता,व्यासंगी लेखकत्व ,असीम त्याग,अतुलनीय धैर्य ,निष्काम स्थितप्रज्ञता ,तत्वचिंतक कर्मयोगी ,महाकवी ,आत्मविश्वासुवृत्ती यांचा सुरेख संगम म्हणजे तात्यराव विनायक दामोदर सावरकर ॥सावरकरांवर धर्मांधतेचा आरोप केला जातो पण -

"आसिंधू सिन्धु पर्यन्त: यस्य भारत भूमिका पित्रभू पुण्यभुश्चैव सवै हिन्दूरिती स्मृता: "

असे म्हणणारे सावरकर धर्मांध कसे काय असु शकतात ? सावरकरांच ' हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व ' जसे होते तसेच त्या ऊलट ही होत म्हणजे ' राष्ट्रियत्व हेच हिंदुत्व ' हेच सावरकराना अपेक्षित होत.माणसा माणसामधे फरक करायला सांगणारा धर्म हा धर्म च असु शकत नाही असे म्हणणारे सावरकर धर्मांध कसे? या उलट जातीवरुन रान माजविणारे ,आंदोलन करून जनतेच्या संपत्तीची नाषधुस करणारे गुंड नि शॅंड पुढारी लोक मात्र धर्मनिरपेक्ष ? सावरकरा ना धर्मांध म्हणणारे स्वता:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात हाच सर्वात मोठा विनोद आहे. ( आणि या लोकशाही देशाची शोकांतिका सुद्दा )

आजचे हे वाचालवीर कोणत्या तोंडाने ' स्वातंत्र्यविरांविरुद्ध ' बोलत आहेत. ?त्यानी थोडासा जरी सावरकर वाचला असता तर अस बोलन श्यक्यच नाही.सावरकर हे नुसते नाव नाही तर देशभक्तीच गाव आहे.सावरकरणी नुसते ' सागर प्राण तळमळला " ही कविताच लिहिली असती तरी ते भारतीय इतिहासात अजरामर राहीले असते. जगातील जे सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र आहेत त्यात सावरकरांच ' माझी जन्मठेप' याचा समावेश होते. मराठीत जे मोजके राष्ट्रीय कविता आहे त त्यातील ७० % हून अधिक कविता या सावरकरानि व त्यांच्या मित्र मंडळीनि म्हणजे अभिनव भारत या संघटनेतील त्यांच्या सहकारयांचा समावेश आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यानी जी हिंधु धर्माच्या पायातील सात बेड्या होत्या त्या तोडल्या म्हणजे हिंदुसंघटनसाठी.१)वेदोक्तबंदी २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी व शेवटी ७) बेटीबंदी. अस्पृषयतेविरुद्धचे त्यांचे कार्य बगून महर्षी विठल रामजी शिंदे सुद्धा बोलून गेले की ' माझे उर्वरित आयुष्य या महापुरुषाला मिळू दे ' ते काय उगाच नव्हे.

सावरकरांची तत्वे तर वापरायची आणि वर त्याला गांधीजींच नाव देऊन सावरकराणा श्रेय द्यायचे नाही. ( सावरकरनी कधीच श्रेय मागितले नाही आणि त्याना ते अपेक्षितही नव्हते। ) हा सुद्ध हरामखोरपणा आहे ।

अरे सावरकरांचा जर सन्मान करू शकत नसाल तर निदान त्यांचा अपमान तर करू नका रे . तो महात्मा आपल्यासाठीच आयुष्यभर लढत राहिला याचे तर भान ठेवा

स्वतच्या कुटुंबाचे तुंबाडे भरू न घेणारे नेते जेंव्हा सावरकरणासारख्या व्यक्तित्वावर टीका करतात तेंव्हा वाटत सावरकरांच्या फोटॉसामोर बसाव आणि मग रडाव...

" का हो तात्या तुम्ही का लढला त आमच्यासाठी। तुम्हाला कोणी नव्हते का? तुम्हाला तुमचे कुटुंब वगैरे नव्हते का?तुम्हाला नाही वाटले का आपणही चार-चौघांसारखे संसार करावा।,श्रीमंत व्हावे, दुसर्‍यांसारखे नाव कमवावे कुणाची तरी हूजरेगिरी करून।का हो तात्या लढळात तुम्ही? सांगा ना का लढला त तुम्ही आमच्या साठी? आम्हा लोकांसाठी तुम्ही का आपला जीव खर्च केलात? सांगा तात्या सांगा । तुम्ही गप्प बसू नका, काही तरी बोला तात्या काही तरी बोला का नाही तुम्ही वकील होऊन सुद्धा केवळ शपथेसाठी वकिली नाकारली ? का ? का तुम्ही तुमच्यावर टीका होऊनही आमच्या साठी लढत राहिलात ? सांगा तात्या सांगा वादळ होऊन शतुंवर कोसळणारे तुम्ही आमच्या साठी एवढी माया का दाखवली त त्यात्या ? ज्या लोकनसाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केलात तीच लोक आज तुम्हाला शिव्या देण्यात जीवनाची इति कर्तव्यता मानीत आहेत

का हो लढलात या हरामखोर लोकांसाठी ? का हो तात्या द्या ना उत्तर ,का ग्प्प बसलात ? काही तरी बोला ,तुमचा हा अबोला मला असह्यय् होत आहे तात्या...का तुम्हाला हे माहीत होते आणि माहीत असून सुद्धा आम्हाला लाजवण्यासाठी तुम्ही गांधीगिरीचा वापर केलात? का हो खर्च केलात तुमच असीम धैर्य ,त्याग आमच्यासारख्या निर्लज्ज आणि बेशराम् लोकांसाठी "

स्वातंत्र्यापूर्वी सावरकरांचे कट्टर विरोधक असणारे आचार्य अत्रे फाळणीनंतर कट्टर सावरकरभक्त बनले. आचार्य अत्रे सावरकरांच्या प्रायोप्वश्णानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या अग्रलेखात म्हणतात की - सावरकर म्हणजे रोजच्या रोज फूल देणारी वनस्पती नव्हे तर सावरकर म्हणजे अनेक वर्षनि उगवणारे ब्रम्हकमल आहेत

सावरकारंबद्दल बोलायचे झाले तर -

" दशदिशा गर्जुन उठल्या ते बो ल त्रिभुवनी घुमले

मरणाला अमर करूनी गेले

मृत्युंजय जगले, जगले

मृत्यूची नव्हती भीती तो जिवलग जीवन साठी

जणू जिवा-शिवाची प्रीती

हे आत्मसमर्पण करूनी त्यालाही सुंदर केले

मृत्युंजय जगले , जगले "

---- सुरुवात -----

तुम्हाला काय वाटल की चुकून लिहिल गेल असेल समाप्त च्या ऐवजी सुरुवात

नाही ओ हीच तर खरी सुरुवात आहे आणि तेंव्हाच समाप्त होणार आहे जेंव्हा सावरकरांची तत्व आपण आचरणात आणून

आपल्या आणि तात्यारावांच्या प्रिय भारतभुला आपण प्रगत राष्ट्र बनवू

तेंव्हा करू यात सुरुवात चला --------------------------------------->